जीवन परिचय – मराठी

देवी वैभवीश्रीजी यांनी २००३ पासून संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मराठी आणि हिंदी भाषेतून श्रीमद भागवत कथा, देवी भागवत, रामायण कथा, शिवमहापुराण, भगवदगीता यांच्या माध्यमातून कथांना आजच्या मानवीय जीवनासोबत जोडून प्रवचने प्रस्तुत केली आहेत. त्यांच्या अमोघ वाणी व विशिष्ट शैलीतून हजारो लोकांनी आपल्या जीवनामध्ये आनंद, शांती आणि उत्साहाची अनुभूती केली आहे.