वाशिम येथे देवी वैभवीश्रीजी यांना “संत सेवाश्री” पुरस्कार प्रदान
रविवार, 17 फेब्रुवारी 2019 वाशिम, महाराष्ट्र : सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या तरूण क्रांती मंच पुरस्कार वितरण सोहळा व महाराष्ट्र शासन, शांतीलाल मुथा फाउंडेशन व्दारा जिल्हयात सुरु असलेल्या मुल्यवर्धन शिक्षकांचा भारतीय जैन संघटनेच्यावतीने आयोजित प्रेरक सन्मान सोहळ्यात पुलगामा येथील शहिद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली, देशभक्तीपर गित व विचाराने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

स्थानिक हिंगोली नाका येथील हॅपी फेसेस सभागृहात तरूण क्रांती मंच व भारतीय जैन संघटनेच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळयाला मंचावर राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील उपस्थित होते. अतिथी म्हणून कार्याध्यक्ष सुरेशचंद्र कर्नावट, स्वागताध्यक्ष संजू आधार वाडे, गौतम वाडे, सहस्वागताध्यक्ष राजू पाटील राजे, कथा वाचिका देवी वैभवीश्रीजी, अध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराज, मुल्यवर्धन जिल्हा समन्वयक तथा अधिव्याख्याता डॉ. क्रांती कुळकर्णी, ऍड. अभय घुडे, उद्योजक अनिल बाहेती, रिपाई आठवले जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, कंत्राटदार सुरेशभाऊ दहात्रे, युनिक कोचींग क्लासेस संचालक प्रा. अतुल वाळले, प्रा. माधव पाटील, प्रा. रोहिदास बांगर, गौरीज वुमन शॉपी संचालिका सौ. भाग्यश्री पाटील, बुलढाणा अर्बन संचालक नंदकिशोर झंवर, तरूण क्रांती मंच जिल्हाध्यक्ष तथा आयोजक निलेश सोमाणी, सुजलाम, सुफलाम जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, बेटी बचाव-बेटी पढाव अभियान संयोजक डॉ. दिपक ढोके, जि.प.प्रकल्प अधिकारी मंगेश गवई, मुलवर्धन समन्वयक अनिल जगताप, नंदराम ढाकणे आदिंची उपस्थिती होती.
सर्वप्रथम पुलगामा येथील शहिद जवानांना दोन मिनीटे मौन पाळून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गायीका सौ. सखुताई लोखंडे यांनी मेरा मुल्क मेरा देश, मेरा यह वतन हे देशभक्तीपर गित सादर केले. तसेच कु. आस्था मेहकरकर या चिमुकल्या बालिकेने आतंकवादीच्या भ्याड हल्यावर परखड मत मांडले.
यावेळी डॉ. रणजित पाटील यांच्याहस्ते संत सेवाश्री पुरस्काराने देवी वैभवीश्रीजी, प्रेमासाई महाराज, जीवनगौरव पुरस्कार उत्तमराव उर्फ बापू देशमुख, वाशीमरत्न पुरस्कार उद्योजक कैलासचंद्र पाटणी व वास्तुविशारद किशोर शर्मा, सेवाव्रती पुरस्कार सर्वश्री योगप्रशिक्षक भगवंतराव वानखेडे, सर्पमित्र दिवाकर कौंडीण्य, गायक शेख मोबीन, व्यसनमुक्ती प्रचारक डॉ. राजीव अग्रवाल, प्रेरणादायी कट्टा चे काशीनाथ कोकाटे, कलावंत शेख मोबीन शेख महेमूद, सायकलस्वार नारायण व्यास, पत्रकार विनोद तायडे, सर्वोत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून मी वाशीमकर गृप, वाशीम अर्बन बॅंक, बुलढाणा अर्बन बॅंक यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, सुवर्ण पदक, फेटा व भेटवस्तु देवून सन्मानित करण्यात आले. सर्व मान्यवरांना डॉ. हरिष बाहेती व ललित राठी यांच्यावतीने भेट वस्तू देण्यात आल्या. तद्नंतर मुल्यवर्धन प्रेरक सन्मानसोहळा पार पडला.

यावेळी देवी वैभवीश्रीजी, प्रेमासाई महाराज, राजु पाटील राजे यांनी आपले विचार व्यक्त केले. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी चांगले विचार, चांगली माणसे, चांगल्या कार्याचे समर्थन जरूरी आहे. आज वाईट प्रवृत्ती ठिकठिकाणी वाढत आहे. त्यामुळे समाजाने आपली नैतिक जबाबदारी स्विकारून व चांगल्या गोष्टी व कार्याला प्रोत्साहन व समर्थन देण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांच्या कार्याची प्रशंसा करीत आपण त्याच्यापाठीशी ठामपणे उभे असून त्याला बळ देण्याचे कार्य करीत आहे. सोमाणी यांचे कार्य समाजाला दिशा देण्याचे असून जो दुसऱ्यासाठी झटतो , त्याला प्रगतीपासून कुणीही रोखू शकत नाही असे परखड मत डॉ. पाटील यांनी मांडले. डॉ. पाटील यांच्या हस्ते सोमाणी यांना शासनाचा राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार घोषीत झाल्याबद्दल सहपत्नीक सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक निलेश सोमाणी, बहारदार संचालन चाफेश्वर गांगवे तर आभार शिखरचंद बागरेचा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. हरिष बाहेती, कार्याध्यक्ष सुरेशचंद्र कर्नावट, स्वागताध्यक्ष नगरसेवक संजू आधार वाडे, सहस्वागताध्यक्ष राजू पाटील राजे, आयोजक निलेश सोमाणी, ऍड. सौ. भारती सोमाणी, संयोजक अनिल केंदळे, डॉ. दिपक ढोके, शिखरचंद बागरेचा, सावन राऊत, संजय भांदुर्गे, संदीप डोंगरे, मदन कोरडे, तेजस सोमाणी, युनिक कोचींग क्लासेस, गौरीज वुमन शॉपी, बेटी बचाव, बेटी पढाव अभियान व मॉ गंगा नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थींनीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठया संख्येने गणमान्य नागरिक, महिला, शिक्षक, युवा-युवती उपस्थित होते.

देशोन्नती वृत्त: http://deshonnati.digitaledition.in/c/36911391